Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक गवळी यांची बदली; नखाते यांची नियुक्ती

जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक गवळी यांची बदली; नखाते यांची नियुक्ती

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-  जळगावचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक येथून अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या गृह विभागाने काल रात्री उशीरा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगावचे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचा देखील समावेश आहे. त्यांची नाशिक येथील गुप्तचर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी गुप्तचर प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे.

 

चंद्रकांत गवळी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्ह्यांच्या शोधात महत्वाची भूमिका पार पाडली. उत्तम जनसंपर्क आणि सहकार्‍यांकडून चांगली कामगिरी करवून घेण्याचा लौकीक असणारे अधिकारी म्हणून ते ख्यात होते. त्यांची बदली झाल्याने आता श्री. नखाते हे जळगावचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.श्री. गवळी यांची कारकीर्द चांगली राहिली असल्याचे उद्गार अनेकांनी काढले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या