Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा प्रशासनाची नवी सेवा ; आता समस्या सोडवण्यासाठी फक्त एक मेसेज...

जळगाव जिल्हा प्रशासनाची नवी सेवा ; आता समस्या सोडवण्यासाठी फक्त एक मेसेज पुरेसा!

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक:- 8275970672 वर तक्रारी नोंदवणे, सूचना देणे, माहिती मागवणे सर्व काही सुविधा एकाच नंबरवर

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी एक नवीन आणि उपयुक्त सेवा सुरू केली आहे. यामध्ये नागरिकांना आता त्यांच्या तक्रारी, सूचना किंवा माहितीच्या गरजा कार्यालयात न जाता थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवता येणार आहेत. या सेवेमुळे नागरिकांना वेळ आणि कष्ट वाचतील. प्रशासनाशी संपर्क ठेवणे सोपे होईल आणि कार्यवाहीबाबत अधिक पारदर्शकता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक – 8275970672

या नंबरवर मेसेज पाठवून खालील बाबी करता येतात:

तक्रारी नोंदवणे

सूचना देणे

माहिती मागवणे

प्रशासनाने सांगितले की, मिळालेल्या संदेशानुसार तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतील आणि नागरिकांना योग्य ती माहिती वेळेवर कळवण्यात येईल. हा उपक्रम “लोकाभिमुख प्रशासन” घडवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या