Monday, March 30, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव क्रिकेट लीग २०२६ ऑक्शन रंगले; ऑलराऊंडर्ससाठी संघांची तुफान बोली

जळगाव क्रिकेट लीग २०२६ ऑक्शन रंगले; ऑलराऊंडर्ससाठी संघांची तुफान बोली

सहा संघ, १५६ खेळाडूंवर बोली; जैन हिल्समध्ये पार पडलेल्या ऑक्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20) स्पर्धेच्या ऑक्शन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये सहा संघांसाठी एकूण १५६ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. विशेषतः ऑलराऊंडर खेळाडूंसाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील खेळाडूंना संघात सामावून घेत प्रत्येक संघाने संतुलित व दमदार संघरचना उभी केली आहे. त्यामुळे यंदाची लीग क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ऑक्शनची तांत्रिक जबाबदारी अभंग जैन, जगदीश चावला, वरूण देशपांडे, हितेश पटेल, समीर गुळवे, उदय सोनवणे, संदीप गांगुर्डे, सुयश बुरूकूल, प्रशांत विरकर आणि मोहम्मद फजल यांनी सांभाळली. तर अॅड. सुरज जहॉंगिर यांनी ऑक्शनर म्हणून प्रभावी सूत्रसंचालन करत वातावरण रंगवले.ऑक्शननंतर सहा संघांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून सर्व संघांनी आपल्या आयकॉन खेळाडूंसह सक्षम खेळाडूंची फळी उभी केली आहे. त्यामुळे ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’मध्ये सहा संघांमध्ये चुरशीचे सामने रंगण्याची चिन्हे आहेत.

सहा संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार..

सुहांस केमिकल्स – अमळनेर जायंटन्स

शुभम शर्मा (आयकॉन), मोहम्मद सैफ, ऋषी यादव, मानव टिबरेवाला, अजय पाटील, यशवंत शिंदे, सतीश चतुर्वेदी, रोहित पारधी, केशव ठाकूर, आर्यन पाटील, निनाद पाटील, रोहित भोई, टिंकू राठोड, जाकीर तडवी, इसरार मोहम्मद, सर्वेश गुळवे, गौरव ठाकूर, सूरज जाधव, राहुल निंभोरे (प्रशिक्षक)

सागर पार्क सीसी – चाळीसगाव चार्जर्स

ओम मुंड े (आयकॉन), साई बनाईत, साहिल गायकर, लोकेश पाटील, शाहरुख शेख, सुरज पाटील, अमेय कोळी, अभिषेक पाटील, अमेय पवार, मितांशु सोनवणे, प्रणव जाधव, योगेश पाटील, मिलिंद सपकाळे, दिनेश ढाकणे, कार्तिक बाटुंगे, कृष्णा ढगे, वकार शेख, रोशन भडांगे, सचिन सोनवण े (प्रशिक्षक)

दाल परिवार – जळगाव किंग्स

जगदीश झोपे (आयकॉन), बिपिन चांगरे, राज बेलदार, उबेद खाटिक, मोहम्मद नदिम, मनीष चव्हाण, मेहुल इंगळे, क्रिष धंडोरे, अक्षय मेघानी, पुर्वेश चौधरी, विराज मंधवानी, जितेंद्र नाईक, राकेश बाविस्कर, सागर भावसार, इमरान पठाण, चिन्मय पोळ, गौरव वाघ, सिद्धार्थ तायडे, घनश्याम चौधरी (प्रशिक्षक)

ऋषभ मेटल अॅण्ड केमिकल्स – जामनेर ब्लास्टर्स

शतायू कुलकर्णी (आयकॉन), प्रदयुम्न महाजन, रामकृष्ण गुरुचरण, क्रिषी नथानी, मासूम खाटिक, ललित पाटील, योगेश तेलंग, कुणाल शर्मा, प्रतीक शिंदे, मानस पाटील, विवेक महाजन, नितलेश चौधरी, मयूर चव्हाण, चेतन वानखेडे, अतुल मोरे, रोहन पाटील, वंश पाटील, अर्शद खान, मुश्ताक अली (प्रशिक्षक)

एस. के. ट्रान्सलाईन – पाचोरा टायटन्स

सचिन चौधरी (आयकॉन), पवन पाटील, रोहित तलरेजा, सिद्धेश देशमुख, कैलास पाटील, विशाल शिरसाठ, निलेश एस. पाटील, वीरेन पाटील, कार्तिक मारवाडी, यश अग्रवाल, श्लोक महाजन, राज केसी, निखिल दुरांडे, कैलास पांडे, चारुदत्त नन्नावरे, जय शर्मा, स्वप्निल सुर्यवंशी, प्र, पवार, पंकज महाजन (प्रशिक्षक)

एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी – रावेर रॉयल्स

नचिकेत ठाकूर (आयकॉन), अनुज पवार, धवल हेमनानी, सचिन पाटील, नेहल अहमद, संदेश सुरवाडे, सज्जाद अहमद, अक्षय कोल्हे, आर्यन नथानी, मोहम्मद नोमान, आदित्य वाणी, कृष्णा माळी, तौसिफ मिर्झा, प्रज्वल पाटील, सोहम जैन, अशफाक शेख, तनवीर अहमद (प्रशिक्षक)

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या