Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावशेठ ला.ना. सा.विद्यालयात भरली आनंददायी दप्तरमुक्त शाळा..

शेठ ला.ना. सा.विद्यालयात भरली आनंददायी दप्तरमुक्त शाळा..

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात, शनिवारी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार तसेच उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांच्या संकल्पनेनुसार आनंददायी, दप्तरमुक्त शाळा भरविण्यात आली.या प्रसंगी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. विविध शैक्षणिक साहित्याची ओळख करून दिली तसेच विद्यार्थ्यांमधील कृतीशीलतेला वाव मिळावा या हेतूने विविध अभ्यासपूरक उपक्रम घेतले.त्यात घड्याळातील वेळ ओळखणे, अक्षर आणि संख्या ओळख, समानअर्थी, विरुद्धार्थी शब्द ओळखणे, मापनाची एकके, आकृती ओळख, क्राफ्ट पेपरच्या सहाय्याने विविध भौमितिक आकृत्या साकारणे आदी क्रिया विविध शैक्षणिक साहित्य वापरून आनंददायी, हसत, खेळत शिक्षण देण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप सर, जेष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे सर, पर्यवेक्षिका रमा तारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या