Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावचे निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाषदादा चौधरी यांचे निधन

जळगावचे निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाषदादा चौधरी यांचे निधन

जळगाव / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह :– जळगाव येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ. सुभाष भास्कर चौधरी (वय 79) यांचे अल्पशा आजाराने काल संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ .क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ.राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत.

डॉ. चौधरी यांनी गेल्या 50 वर्षांपासून श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा केली. डॉ.चौधरी हे लेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. यासह बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य, महावीर सहकारी बँकेचे संचालक होते, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांची अंतिमयात्रा दुपारी 3:30 वाजता राहते घर, प्रताप नगर येथून निघून जैन हिल्स, शिरसोली रोड येथे जाईल व तिथे अंतिम संस्कार होतील. त्यांना पोलीस दक्षता लाईव्ह तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या