जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले युवराज पाटील यांची पुणे येथे बदली झाल्यानिमित्त, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (विकास) वतीने त्यांना औपचारिक निरोप देण्यात आला. या प्रसंगी दूध संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या कार्यकाळातील सकारात्मक सहकार्याचे विशेष कौतुक केले. जिल्ह्यातील माहिती व जनसंपर्क कार्य अधिक प्रभावीपणे राबवताना त्यांनी प्रशासन, माध्यम आणि विविध संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधला.
कार्यक्रमादरम्यान दूध संघाच्या (विकास) विविध लोकप्रिय उत्पादनांचा आकर्षक गिफ्ट ट्रे युवराज पाटील यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला. यामध्ये संघाची दर्जेदार दुग्धजन्य उत्पादने समाविष्ट होती. तसेच, त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संजय पवार, अरविंद देशमुख, शैलेश मोरखेडे, पराग मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देत त्याच्या कार्यशैलीचे कौतुक केले.