Friday, April 3, 2026
police dakshta logo
Homeक्राईमगावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह दोघे ताब्यात ; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह दोघे ताब्यात ; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील कुसुंबा-एअरपोर्ट रोड परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने पकडून अटक केली. आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच दुचाकीसह एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कुसुंबा-एअरपोर्ट रोडवरील तारा बिझनेस पार्क परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे समजताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.दि. २८ मार्च २०२६ रोजी सापळा रचून पथकाने संशयित दुचाकीस्वारांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान चालकाच्या कमरेला एक गावठी कट्टा व खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. दुर्गा नगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) व विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, रा. दुर्गा नगर, सिल्लोड, जि. संभाजीनगर) अशी आहेत. चौकशीत त्यांनी जळगावातील तांबापुरा भागातील अजय बिरजू गारुंगे याच्याकडून गावठी कट्टा विकत घेतल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, ३ हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे, १ लाख रुपये किमतीची बजाज पल्सर RS २०० दुचाकी व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय बिरजू गारुंगे हा फरार आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पुढील तपास पो.उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पो.का. चेतन पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या