जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पिंप्राळा हुडको परिसरात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असलेल्या एकाच्या विरोधात कारवाई करत रामानंदनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, पिंप्राळा हुडको परिसरातील महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे या व्यक्तीने हातात गावठी बनावटीचा कट्टा उचलून परिसरात दहशत माजवत आहे. नागरिक व दुकानदार घाबरून आपली दुकाने बंद करत असल्याने तत्काळ पोलिस निरीक्षक गुंजाळ यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने महेंद्रचा शोध घेणे सुरू केले. पिंप्राळा रोडवरून तो खंडेराव नगरकडे पळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे.
महेंद्र सपकाळेवर याआधीही रामानंदनगर पोलिस ठाण्यात ५ गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.