Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावगोलाणी मार्केटमध्ये जुन्या वादातून चाकूहल्ला ; तरुण गंभीर जखमी, आरोपी ताब्यात

गोलाणी मार्केटमध्ये जुन्या वादातून चाकूहल्ला ; तरुण गंभीर जखमी, आरोपी ताब्यात

जळगाव । प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणूक अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचननगर परिसरातील शुभम रवींद्र सोनवणे याने धनाजी नाना महाविद्यालयाच्या मागील भागात राहणाऱ्या यश (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) या तरुणावर गर्दीच्या ठिकाणी चाकूने वार केला. दोघांमध्ये पूर्वीपासून असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेल्या तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले आहे.

या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या