Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव गोळीबार...तरुणाचा मृत्यू प्रकरण : हद्दपार आरोपीसह तिघे आरोपी अटकेत

जळगाव गोळीबार…तरुणाचा मृत्यू प्रकरण : हद्दपार आरोपीसह तिघे आरोपी अटकेत

कांचननगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीची धक्कादायक घटना

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील कांचननगर परिसरात हद्दपार आरोपीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास १०.१५ वाजता घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीतून हद्दपार करण्यात आलेला आरोपी आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे हा परवानगीशिवाय कांचननगर भागात आला होता. त्याचप्रमाणे दुसरा हद्दपार आरोपी गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे हाही चोरून शहरात प्रवेश करून प्रशांत चौक येथे आला होता. यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

या वादातून आकाश सपकाळे याने विकी अरुण चौधरी व करण चंद्रशेखर पाटील यांच्या संगनमताने गणेश सोनवणे याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. पहिली गोळी गणेश सोनवणे याच्या डाव्या हातावर लागली. दुसऱ्या फायरमध्ये गोळी आकाश उर्फ टपऱ्या युवराज कोळी या तरुणाच्या छातीत घुसली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पोलिसांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने आरोपी विकी अरुण चौधरी यास अटक करून न्यायालयात हजर केले असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या पथकाने आरोपी आकाश उर्फ डोया सपकाळे व करण चंद्रशेखर पाटील यांनाही शोधून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर, शनिपेठ पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि अन्य पुरावे शोधण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या