Saturday, November 16, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव ग्रामीण मध्ये मनसेच्या पाच शाखा फलकांचे अनावरण...

जळगाव ग्रामीण मध्ये मनसेच्या पाच शाखा फलकांचे अनावरण…

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- दि१०/०२/२०२४ रोजी मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जळगाव ग्रामीण मधील १००० तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तसेच सहा शाखांचं अनावरण करण्यात आलं. नांद्रा येथे शखांचे उद्घाटन करून जाहीर सभा घेण्यात आली. मनसेत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये विदगाव, डिक्साई, अमोदा, वडनगरी, नांद्रा, या गावातील तरुणांचं मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर त्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मनसे शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मतदार आशा लावून बसलेला आहे. 

जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास सज्ज राहावे, आपल्या शाखेजवळ आपला कट्टा असला पाहिजे. आपण लोकांच्या मूलभूत सुविधा ओळखून त्या सोडवल्या पाहिजेत, कारण सध्य स्थितीमध्ये ज्यांना निवडून दिले आहे ते प्रस्थापित लोक काम करत नाही, म्हणूनच लोक आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहेत. म्हणून आपण कामाला गती द्यावी ग्रामीणमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असून, मूलभूत सुविधा जनतेला मिळत नाहीत.त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मतदार आशा लावून बसलेला आहे. आता आपण जोमाने कामाला लागावे असे आशयाचे मनोगत मनसे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मुकुंद रोटे यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनीही पदाधिकारी व गावातील असंख्य नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण उभं राहावे व त्याने काम केल्यावर शाबासकीची थाप द्यावी, अशी हाक जनतेसमोर दिली. तसेच जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन झालं तसेच जनहित कक्षाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम, उपमहानागराध्यक्ष जळगाव आशिष सपकाळे, शेतकरी संघटनेचे अविनाश पाटील, महाराष्ट्र सैनिक कपिलेश पाटील, जनहितचे जळगाव शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

असंख्य कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष हेमंत कोळी,उप तालुका अध्यक्ष शैलेश चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सपकाळे, गोरख गायकवाड, रवींद्र सोनवणे, प्रशांत सोनवणे ,अक्षय वाघ ,शरद सोनवणे ,मोहित कोळी, पवन कोळी, नरेंद्र पाटील, जयेश गुरव, अक्षय सोनवणे, प्रवीण सोनवणे, आकाश सोनवणे, विजय सोनवणे ,अजय सोनवणे ,महेश सोनवणे ,गणेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे ,गोपाळ सोनवणे ,हेमराज सोनवणे, समाधान सोनवणे, हर्षल सोनवणे, निवृत्ती सोनवणे, तुषार पाटील, जितेंद्र सपकाळे, रोहित चव्हाण, गणेश पाटील, लखन चौथ मॉल, महेश कोळी, गणेश सोनवणे, सौरभ सोनवणे, समाधान बाविस्कर, अनिल कोळी, आदी असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली तसेच सूत्रसंचालन आय.टी चव्हाण सर यांनी केले व आभार शैलेंद्र चौधरी यांनी मांडले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या