जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेतर्फे प्रथम जाहीर झालेल्या यादीत जळगाव शहर मतदार संघातून डॉ.अनुज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर आता पक्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून मुकुंदा रोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष देखील आहेत.
मुकुंदा रोटे यांच्या कामाची पावती म्हणून उमेदवारी जाहीर
सुरुवातीपासून मनसे सोबत काम करीत असल्याने ते पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. मुकुंदा रोटे हे नशिराबाद येथील रहिवाशी असून त्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून जनहिताचे अनेक कामे केली आहेत. त्यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क असून, त्यांनी गावा गावात जाऊन कार्यकर्त्यांसोबत गावकऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या,पक्ष संघटना मजबूत केल्या, तसेच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याचीच पावती म्हणून त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले होते. याच त्यांच्या कामगिरीच्या जोरावर त्यांना आता पक्षाने जळगाव ग्रामीण मधून उमेदवारी दिली आहे.
29 ऑक्टोबर मंगळवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुकुंदाभाऊ रोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दिनांक 29 ऑक्टोबर मंगळवार रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. सकाळी 11 वा. बालाजी मंदिर धरणगाव येथून रॅली निघणार असून दुपारी 1 वा. पर्यंत तहसील कार्यालय येथे अर्ज दाखल करणार आहे