जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षात लाईव्ह :- जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवण्यात आले. ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली.संपूर्ण जिल्हाभरात एकाच दिवशी राबवलेल्या मोहिमेत १३४ गुन्हे नोंदवण्यात आले, तर ₹१४.४८ लाखांच्या मुद्देमालासह मोठ्या प्रमाणात दारू आणि कच्चा माल जप्त करण्यात आला.
कारवाईतील महत्त्वाचे तपशील:
जप्त दारू: ३३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, जप्त रसायन: २०१५० लिटर, वाहने: १ चारचाकी वाहन, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹१४,४८,६६२
विभागवार कारवाई:
पोलिस विभाग:, ९९ गुन्हे नोंद, २८४५ लिटर दारू व ५६३० लिटर रसायन जप्त, किंमत: ₹६,१२,३८२
राज्य उत्पादन शुल्क विभाग:
३५ गुन्हे नोंद, ५४० लिटर दारू, १४५२० लिटर रसायन व एक वाहन जप्त, किंमत: ₹८,३६,२८०
जनतेस आवाहन:
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अवैध दारू उत्पादन, विक्री किंवा वाहतूक आढळल्यास खालील क्रमांकांवर माहिती द्यावी:
टोल फ्री क्रमांक: 1800-233-9999
व्हॉट्सॲप क्रमांक: 8422001133
आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही मोहीम “दारूमुक्त जिल्हा” या उद्दिष्टाकडे एक महत्त्वाचं पाऊल ठरत असून, भविष्यात अशा कारवाया सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.