Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव: हनुमाननगरात अल्पवयीन मुलीची सुटका ; वेश्या व्यवसायासाठी डांबणाऱ्यास अटक

जळगाव: हनुमाननगरात अल्पवयीन मुलीची सुटका ; वेश्या व्यवसायासाठी डांबणाऱ्यास अटक

जळगाव |प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :-जळगाव येथील हनुमाननगर परिसरातील एका घरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचला. बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून खात्री केल्यानंतर संबंधित घरावर छापा टाकण्यात आला.छाप्यात विजय तायडे या संशयिताने आर्थिक लाभासाठी अल्पवयीन मुलीला बंदिस्त ठेवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा व अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक (पिटा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार नितीन बाविस्कर, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे यांच्यासह मानव तस्करी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

संशयित आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या