जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील खराब आणि धोकादायक ठिकाणी दुरुस्तीची कामे आज पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने पॅचवर्क, खड्डे बुजवणे, तसेच सुधारणा आणि सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या. दुरुस्ती दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना लक्षात घेऊन ही कामे तातडीने हाती घेण्यात आली होती.
या कामांमुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक आता सुकर होणार असून, अपघाताच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे. भविष्यात अधिक टिकाऊ आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे नियोजन विभागाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.