Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावब्रेकिंग न्यूज: हॉटेल रॉयल पॅलेसमधील एका रूममध्ये जुगार अड्डा...! 20 लाखांच्या मुद्देमालासह...

ब्रेकिंग न्यूज: हॉटेल रॉयल पॅलेसमधील एका रूममध्ये जुगार अड्डा…! 20 लाखांच्या मुद्देमालासह 8 जण अटकेत..

एलसीबी’ ची धडक कारवाई…..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे आणि विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. काही गुन्हे उघडकीस येतात तर काही गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असतात ,तपास ढिम्म पद्धतीने होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान स्थानिक गुन्ह्याचा तपास शाखेने ( एल.सी.बी ) जळगाव शहरात एक मोठी कारवाई केली आहे.या कारवाई बद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील महाबळ रोडवरील प्रसिद्ध हॉटेल रॉयल पॅलेस येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूममध्ये सुरु असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.या कारवाईत जवळपास २० लाख रुपयांच्या मुद्देमालासह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे. हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला.

याबाबत अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, त्यांनी पथक तयार करून ११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते 2 वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ व्यक्ती जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून १९ लाख ९७ हजार रुपये किमतीचे रोख रक्कम आणि वेगवेगळया कंपनीचे १३ मोबाईल हॅन्डसेट असा मुद्देमाल मिळून आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये वचक बसला आहे. अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान पथकाने केलेल्या कारवाईत हॉटेलमध्ये पप्पु सोहम जैन, वय-४४, रा. बळीरामपेठ, भैय्या हवेली जवळ जळगांव, रुखील वय-३०, रा.एमआयडीसी, जळगाव, भावेश पंजोमल मंधाण, वय-३७, रा.राजाराम नगर सिंधी कॉलणी, जळगांव, मदन सुंदरदास लुल्ला, वय-४२, रा.गणपतीनगर जळगांव, सुनील शंकरलाल वालेचा वय-४०, रा.सिंधी कॉलनी कंवरनगर, जळगांव, अमीत राजकुमार वालेचा वय ४५, रा.गणेशनगर जळगांव, विशाल दयानंद नाथानी, वय-४८, रा. गणेश रा.गायत्रीनगर घर नं.७० जळगांव, कमलेश कैलाशजी सोनी, वय-३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड, जळगांव हे मिळून आले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि टीमचे कर्तृत्वाचे स्वागत होत आहे. जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसर आणि एमआयडीसी परिसरातील काही मोठ्या हॉटेल मध्येही काही अवैध धंदे व छुप्या पध्दतीने कॉल गर्ल येत आहेत का ..? याचा देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या