Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यीय वधू-वर-पालक परिचय मेळावा

जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यीय वधू-वर-पालक परिचय मेळावा

दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लेवा भवन, जळगाव येथे भव्य आयोजन.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- विवाह इच्छुक युवक-युवतींच्या पालकांचा वेळ, श्रम व खर्च वाचवून एकाच व्यासपीठावर अधिकाधिक सुयोग्य विवाहयोग्य स्थळांची उपलब्धता व्हावी, या सामाजिक हेतूने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ तर्फे तृतीय निःशुल्क आंतरराज्यीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिस मागे, एस.टी.स्टँड मागे, जिल्हा पेठ, जळगाव (खानदेश) येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, तो पूर्णपणे निःशुल्क असून, चर्मकार समाजातील सर्व जाती-पोटजातींसह घटस्फोटित, विधवा, विधुर, अंध, अपंग, मूकबधिर आदी सर्वसमावेशक घटकांना सहभागी होण्याची संधी दिली आहे. समाजातील सर्व स्तरांतील युवक-युवतींसाठी हा मेळावा एक अद्वितीय सामाजिक उपक्रम ठरणार आहे.या सामाजिक कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रीमहोदय नामदार श्री. संजयजी सावकारे, नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन, नामदार श्री. गुलाबराव पाटील, खासदार सौ. स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजुमामा भोळे, आमदार प्रा. श्री. चंद्रकांतजी सोनवणे, आमदार श्री. चंद्रकांतभाऊ पाटील, आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, माजी महापौर श्री. विष्णूभाऊ भंगाळे, डॉ. सौ. केतकीताई पाटील तसेच समाजातील विविध अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्याचे आयोजन पुढील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे :
प्रदेशाध्यक्ष मान. श्री. संजयजी खामकर साहेब, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथभाऊ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. संजय वानखेडे सर, राज्य संघटक डॉ. श्री. संजय भटकर सर, प्रदेश सहसचिव ॲड. श्री. चेतनभाऊ तायडे, श्री. प्रकाश रोजतकर, जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. अर्जुन अण्णा भारुळे, कार्याध्यक्ष सरपंच श्री. राजेश वाडेकर सर, सचिव प्रा. श्री. धनराज भारुळे, श्री. गजानन दांडगे, श्री. विजय पवार, श्री. कमलाकर ठोसर आदींचा समावेश आहे.तसेच वधू-वर परिचय समिती प्रमुख श्री. केशव ठोसरे, उपप्रमुख श्री. बाळकृष्ण खिरोळे, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. वसंतराव नेटके, श्री. काशीनाथ इंगळे, श्री. राजेंद्र बावस्कर, श्री. कैलास वाघ सर, श्री. मनोजभाऊ सोनवणे, श्री. कमलाकर ठोसर, श्री. पंकज तायडे, श्री. खंडू पवार, श्री. शिवदास कळसकर, श्री. उमाकांत भारुळे, श्री. प्रशांत सोनवणे, श्री. सुधाकर मोरे, श्री. रतिराम सावकारे आदींनी या मेळाव्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

तरी या सामाजिक उपक्रमात चर्मकार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती तसेच त्यांचे पालक, समाजबंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या