चर्मकार समाजातील विवाहइच्छुक युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर सुयोग्य जोडीदार मिळविण्याची संधी..
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चर्मकार समाजातील विवाहइच्छुक युवक-युवती, तसेच पालकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचावा व सुयोग्य जोडीदार एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावा, या सामाजिक उद्देशाने जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे तृतीय आंतरराज्यीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), जळगाव येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे आयोजन पूर्णपणे निःशुल्क (मोफत) असून, चर्मकार समाजातील सर्व विवाहइच्छुक उपवर युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या भव्य सामाजिक मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून नामदार श्री. संजयजी सावकारे (वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य), खासदार सौ. स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजुमामा भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, तसेच जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख व माजी महापौर श्री. विष्णूभाऊ भंगाळे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास विविध मान्यवर पदाधिकारी, समाजनेते व अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. चर्मकार समाजातील इच्छुक वधू-वरांनी आपल्या रंगीत छायाचित्रांसह सविस्तर परिचयपत्र बुधवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत खालील संपर्क क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक व पदाधिकारी :
श्री. संजय वानखेडे सर (प्रदेश सदस्य) – ८६२५९६५२४१,
डॉ. संजय भटकर (राज्य संघटक) – ९९२३००५२७६,
श्री. विश्वनाथ सावकारे (प्रदेश उपाध्यक्ष) – ९५९५३०४०४४,
श्री. वसंतराव नेटके (ज्येष्ठ मार्गदर्शक) – ९४२२७८४३७०,
ॲड. श्री. चेतन तायडे (प्रदेश सहसचिव) – ८६६९०५६३४४,
श्री. मनोजभाऊ सोनवणे (नाशिक विभागीय अध्यक्ष) – ९७९०५६३१६६,
सौ. ज्योतीताई निंभोरे (विभागीय महिला अध्यक्ष) – ९४२१००४७८९,
ॲड. अर्जुन भारुळे (जिल्हा अध्यक्ष) – ८४२१५६९४४४,
श्री. देवीदास मोरे (विभागीय उपाध्यक्ष) – ९४२१६१०४४५,
प्रा. श्री. धनराज भारूडे (जिल्हा सचिव) – ९४०५६२६३३२,
डॉ. कडू भोळे (ज्येष्ठ सल्लागार) – ९८९०१६११०१,
श्री. राजेश वाडेकर सर (जिल्हा कार्याध्यक्ष व सरपंच) – ९४२०३८८६९७,
श्री. कमलाकर ठोसर (महानगराध्यक्ष), श्री. पंकज तायडे व श्री. प्रकाश रोजतकर (जिल्हा उपाध्यक्ष)
उपवर युवक-युवतींनी आपल्या परिचयपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून व्यासपीठावर स्वतःचा परिचय द्यावा, असे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी खामकर साहेब व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. या उपक्रमाद्वारे समाजातील विवाहइच्छुक युवक-युवतींना एकाच ठिकाणी सुयोग्य जीवनसाथी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून, सामाजिक एकतेचा व सुसंवादाचा हा मेळावा समाजाच्या प्रगतीसाठी एक आदर्श ठरणार आहे.

