जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त १७१ पदे भरण्यासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया सध्या सुरू असून दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचा दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात आला आहे.सदर दिवशी शारीरिक चाचणीसाठी एकूण १००० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्ष ७४८ उमेदवारांनी उपस्थिती नोंदविली. उपस्थित उमेदवारांपैकी ७३ उमेदवार शारीरिक मोजमाप चाचणीत अपात्र ठरले, तर २९५ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र ठरल्याची माहिती देण्यात आली.आजच्या संपूर्ण प्रक्रियेत एकूण ३८० उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करून पुढील प्रक्रियेसाठी पात्रता मिळविली आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने राबविण्यात येत असून उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती जनसंपर्क विभागामार्फत देण्यात आली आहे

