Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्हा पोलिस दलात नव्या युगाची सुरुवात ; आधुनिक वाहने दाखल

जळगाव जिल्हा पोलिस दलात नव्या युगाची सुरुवात ; आधुनिक वाहने दाखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने नव्या आधुनिक पोलीस वाहनांचा ताफा आजपासून सेवा कार्यात दाखल करण्यात आला आहे.या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते.

नवीन वाहने खालील विभागांसाठी वितरित करण्यात आली:

पोलीस अधीक्षक कार्यालय

अपर पोलीस अधीक्षक

उपविभागीय पोलीस अधिकारी

गस्त व एस्कॉर्ट ड्युटी यंत्रणा

जळगाव जिल्ह्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

राज्यात प्रथमच – सर्व पोलीस बीट कॉन्स्टेबलकडे स्वतःची दुचाकी उपलब्ध

सर्व पोलीस ठाण्यांमध्ये किमान एक ते तीन चारचाकी वाहने

जिल्हाभरात विशेष तपासणी नाके (Checkposts) कार्यान्वित

या उपक्रमाचा उद्देश गुन्हेगारीवर नियंत्रण, पोलिसांची तत्परता वाढवणे, गस्त प्रभावीपणे राबवणे आणि कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करणे आहे. जळगाव जिल्हा पोलिस दल आता स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेने आगेकूच करत असून, नागरिकांचा विश्वास आणि सुरक्षितता हे यंत्रणेचे प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या