Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगाववीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपीक ताब्यात..!

वीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपीक ताब्यात..!

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील रायपूर येथे निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य विरूध्द ३ अपत्य असल्या बाबत तक्रार दाखल होती.या संदर्भात अहवाल त्यांच्या बाजूने सादर करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतच्या केलेल्या कारवाईमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार हे निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात तीन अपत्य असल्या कारणाने या संदर्भात एकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.

अशी करण्यात आली कारवाई..

दरम्यान कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे (वय-३०) आणि समाधान लोटन पवार (वय-३५) या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी ९ मार्च शनिवार रोजी लाचलुचपत विभागात यासंदर्भात तक्रार दिली.या दरम्यान पथकाने तत्काळ सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार याला मागणी केलेल्या एकूण ३० हजार पैकी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई..

या कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ यांनी सापळा यशस्वी केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या