Saturday, November 23, 2024
police dakshta logo
Homeहवामानजळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट; मान्सून झाला सक्रिय

जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट; मान्सून झाला सक्रिय

जळगाव / प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे.गेल्या सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तीन, चार दिवस पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा १४ सप्टेंबरपासून मान्सून सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे मान्सून सक्रीय झाला आहे.

अनेक जिल्ह्यात पुढील २४ तासांत पाऊस महाराष्ट्र राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील काही तासांत याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय होईल आणि राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे.

विदर्भ आणि कोकणात १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा राज्यात पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात पडणार पाऊस आणि परतीचा पाऊस महत्वाचा ठरणार आहे. या पावसावरच राज्यातील पुढील रब्बी हंगामाने भवितव्य अवलंबून राहणार आहे. कोकणात १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात १६ ते १७ सप्टेंबर दरम्यान तर मध्य महाराष्ट्रात १६ आणि १७ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या