Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची दादागिरी वाढली; मंडळ अधिकार्‍यांना ठार मारण्याची धमकी

जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची दादागिरी वाढली; मंडळ अधिकार्‍यांना ठार मारण्याची धमकी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढली असून एका महिला मंडळ अधिकार्‍याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.वढोदे ता.यावल ते शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतुक करणार्‍यांनी पर्यवेक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या बामणोद येथील कार्यरत महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना कर्तव्यावर असतांना धक्काबुकी व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊन ट्रॅक्टर वरून हात ओढून खाली खेचले व विनयभंग केला या प्रकरणी पोलीसात त्या अज्ञात वाळू वाहतूक करणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बामणोद तालुका यावल येथे बबीता सुधाकर चौधरी या मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ३१ ऑगस्ट रोजी त्यांचेकडे महसूल प्रशासनाच्यावतीने थोरगव्हाण तालुका यावल करीता पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट गुरूवार रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास पर्यवेक्षक बबीता चौधरी या खाजगी वाहनाने थोरगव्हाण कडे जात असतांना वढोदे प्रगणे यावल ते शिरसाड या रस्त्यावर वढोदे गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करीत असतांना आढळून आले.संबधीत ट्रॅक्टर चालकाकडे बबीता चौधरी यांनी वाळू वाहतुकीचा परवाना मागीतला असता परवाना नसल्याचे सांगून थोरगव्हाणच्या पर्यवेक्षक आणि बामणोदच्या महिला मंडळ अधिकारी असलेल्या सौ.चौधरी यांच्याशी ट्रॅक्टरचालक निलेश समाधान सोनवणे याने हुज्जत घातली व धक्काबुकी करीत विनयभंग करून शिविगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.दरम्यान संबधित ट्रॅक्टर वाहन चालक निलेश सोनवणे रा. थोरगव्हाण तालुका यावल व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या