Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeखेळ जगतपुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन

पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा २०२५-२०२६ व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आज जळगाव येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्या वतीने तसेच जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनतर्फे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव’ येथे ही स्पर्धा दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे, जैन इरिगेशनचे रवींद्र धर्माधिकारी, खजिनदार रवींद्र मेटकर, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जी.एस. चे संचालक अनिल देशमुख, आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टूर्नामेंट डायरेक्टर अमोल देसाई, राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर, तांत्रिक सदस्य अतुल बामनोदकर, सचिन देवळे, वृषाली लेग्रस, उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील, तांत्रिक समिती अध्यक्षा दर्शना लखानी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील सुमारे ३५० मुलं-मुलींनी सहभाग नोंदवला असून, पहिल्या दिवशी स्पर्धा चांगल्याच रंगल्या. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना या स्पर्धेमुळे ज्यूदो खेळासाठी मोठे प्रोत्साहन मिळत असून, जिल्ह्यात ज्यूदो क्रीडाप्रकाराचा प्रसार अधिक वेगाने होण्यास मदत होत आहे.अध्यक्ष व माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे आणि सचिव प्रा. डॉ. उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावचे वातावरण ज्यूदोमय झाले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव प्रा. डॉ. उमेश पाटील, योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचिन वाघ, डॉ. चांद खान, अशफाक शेख तसेच जिल्हा ज्यूदो हौशी संघटनेचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, उद्या (दि. २ नोव्हेंबर) स्पर्धेचा समारोप सोहळा संपन्न होणार असून, या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार व सुप्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वलजी निकम, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील आणि महेश पाटील यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनाबाबतची माहिती सचिव प्रा. डॉ. उमेश पाटील आणि तुषार वाघुळदे यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या