Tuesday, January 28, 2025
police dakshta logo
Homeजळगावब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा कारागृहात दगडफेक; एक गंभीर

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हा कारागृहात दगडफेक; एक गंभीर

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह :-जळगाव शहरातील जिल्हा कारागृह येथे शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी १० वाजेच्या सुमारास बंदिवान कैद्यांच्या दोन गटात गटांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दगडफेकीत व हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव जिल्हा कारागृह वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी बॅरिकेट क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ यांच्यात जुन्या वादातून दोन गटात सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. त्यानंतर हा वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोन गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड (वय 30) रा. सबजेल जळगाव हा बंदीवान कैदी हे जखमी झाला आहे तर इतर कैदी यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. जखमी कैद्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. हा वाद कशावरून झाला याची माहिती उपलब्ध झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या