Friday, November 22, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या खोटेनगरात एकटाच राहणाऱ्या तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

जळगावच्या खोटेनगरात एकटाच राहणाऱ्या तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव- खोटेनगर परिसरात राहणाऱ्या आणि एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब लोटन पवार (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील खोटेनगर परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.बाळासाहेब हा तरुण एमआयडीसी परिसरात एका कंपनीत कामाला होता. त्याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा युवक जळगावातील खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता.रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर दिसून न आल्याने घरमालक यांना संशय आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता बाळासाहेब हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिली.घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.

दरम्यान, या युवकाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या