जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात गंभीर कुपोषणाने ग्रस्त असलेल्या (Severe Acute Malnutrition – SAM) मुलांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून विशेष तपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांत एकूण १००० मुलांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यापैकी ८१५ मुले उपस्थित राहिली आणि त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली. उर्वरित १८५ मुले अनुपस्थित होती.
शिबिरांमध्ये उपस्थित मुलांपैकी अनेकांना रक्त तपासणी (CBC), एक्स-रे, 2D Echo अशा वैद्यकीय चाचण्या सुचवण्यात आल्या. ६ मुलांना NRC (पोषण पुनर्वसन केंद्रात) दाखल करण्यात आले, तर एकाला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. ७१६ मुलांना औषधोपचारासाठी पाठवण्यात आले, आणि ६५७ पालकांना सुदृढ आहार विषयक सल्ला देण्यात आला.