Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव: मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जळगाव: मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

मेहरूण, जळगाव येथे संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानांतर्गत श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव येथे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले.

या शिबिराचा मेहरूण परिसर, रामेश्वर कॉलनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील व डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी आरोग्य तपासणी केली. तर नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली असून मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. डॉ. अमिता श्रीवास्तव व प्रशिक्षणार्थी डॉ. प्राची खलसे यांनी मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या व त्या काळात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स प्राची खलसे, भावना दातीर, हषदा पाटील, श्रद्धा चौधरी, फैज खान आदी उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहिले. श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी.ई.तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक डॉ.नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नवल परदेशी, आकाश सोनावणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान, प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या