जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा जिल्हापेठ पोलीस ठाण्याने छडा लावून दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बसस्थानक येथून मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दि.२० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करताना प्रभारी अधिकारी यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. यामध्ये आरोपी आकाश राजू खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव, सध्या पिंप्राळा हुडको, जळगाव) व आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली.दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून एक दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती.चौकशीदरम्यान त्यांनी जळगाव शहरातील भज्जी गल्ली परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.त्यानुसार त्यांच्या ताब्यातून होंडा कंपनीची ड्रीम मोटारसायकल (क्र. MH १९ DA ५०११) जप्त करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल सांळुके, गोविंद साबळे व जयेश मोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

