Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव: पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी...

जळगाव: पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी धुळे ACB च्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहितनगर, जळगाव रोड, भुसावळ) याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवार, दि. २४ रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.तक्रारदाराने पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला असताना, संबंधित आरेखकाने सुरुवातीला दोन हजार रुपये आणि काम पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर पथकाने सापळा रचून पाथरवट याला १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या