Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमआगामी महानगरपालिका निवडणुकीत शांततेसाठी २४ सराईत गुन्हेगार जळगाव शहरातून हद्दपार

आगामी महानगरपालिका निवडणुकीत शांततेसाठी २४ सराईत गुन्हेगार जळगाव शहरातून हद्दपार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात आली आहे.जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग यांच्या कार्यालयामार्फत मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग यांच्याकडे निवडणूक काळात गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील १८ तसेच जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील ६ अशा एकूण २४ गुन्हेगारांना जळगाव शहरातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार संबंधित २४ इसमांना दि. ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जळगाव शहराच्या हद्दीत कोणत्याही प्रकारे प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांनी शहरातून तात्काळ बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित इसमांना केवळ दोन तासांसाठी शहरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर त्यांनी त्वरित जळगाव शहर सोडणे बंधनकारक राहणार आहे.निवडणूक काळात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेल्या या निर्णायक पावलामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा कडक बंदोबस्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या