जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षात लाईव्ह: दि. 22 जानेवारी 2025 रोजी बेटी बचाओ ,बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झालेले असून त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दि. 06 मार्च रोजी गुरुवारी सकाळी 9. 00 वा. पोलीस मुख्यालय पासून महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांची बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या बेटी बचाओ ,बेटी पढाओ निमित्त आयोजित बाईक रॅली दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील 105 महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांनी सहभाग घेतला. बाईक रॅली मध्ये जळगाव जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना बेटी बचाओ बेटी पढाओ संदेश देण्यात आला.
या बाईक रॅली उपक्रमाला मा.पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे हजर होते. त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. या वेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जळगाव उपविभागातील सर्व सर्व प्रभारी अधिकारी व इतर महिला अधिकारीअंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते….