जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यासाठी, जिल्हा पोलीस दलामार्फत मोठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ‘नाकाबंदी’ आणि ‘ऑल आऊट ऑपरेशन’ करण्यात आले.या विशेष मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा सहभाग असून, एकूण २६९ पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली होती.
मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख कारवाया :-
वाहन तपासणी…
विविध नाकाबंदी पॉईंटवर एकूण २,४५८ वाहने तपासणीअंतर्गत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ६७१ प्रकरणे दाखल.
वाहनधारकांकडून ₹५,१०,३५०/- दंड वसूल.
गुन्हेगारी तपास / तडीपार आरोपी…
८२ तडीपार आरोपींची तपासणी.
१४८ NBW वॉरंट बजावले.
गुन्हे नोंद…
एकूण १४ प्रकरणे दाखल.
कायद्यानुसार ठोस गुन्हा १ दाखल.
अवैध धंद्यावर कारवाई.
प्रोव्हीजन कायदा अंतर्गत — ९० गुन्हे नोंद.
जुगार कायदा अंतर्गत — ३४ गुन्हे नोंद.
अंमली पदार्थ (NDPS Act) — २२ गुन्हे नोंद.
शस्त्र कायदा (Arms Act) — कारवाई.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई.
हॉटेल / लॉज तपासणी विविध ठिकाणच्या १३५ हॉटेल्स व लॉजेसची तपासणी…
जळगाव जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी आणि समन्वयाने राबविलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसला आहे. नाकाबंदी व ‘ऑल आऊट’मुळे गुन्हेगारांवर प्रभावी वचक निर्माण झाला आहे.
“कायदा मोडणाऱ्यांना कुठेही वाव नाही. अशा मोहिमा यापुढेही सुरू राहतील.” असा स्पष्ट संदेश जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे दिला गेला आहे.

