जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी मुंबई येथे पालघर बंदोबस्तासाठी जात असताना मोखाडा घाटात पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांना नाशिक येथे हलविण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मुंबई येथे बंदोबस्त कामी जात होते. पोलीस वाहन क्रमांक एमएच.१९. सीयु.५०९३ ने जात असताना मोखाडा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.घटनास्थळी गावकऱ्यांनी मदत केली आहे. जखमींना नाशिक येथे हलविण्यात येत आहे.
पोलीस वाहनात उल्हास राणे, शेखर पाटील, अमोल देशमुख, प्रमोद कंडारे, महेंद्र भटीत, संदीप ठाकरे, बाळू पाटील, करुणासागर जाधव, हेमंत साळुंखे, जितेंद्र पांडव, संतोष बोरसे, अनिल पाटील, रवी जाधव हे कर्मचारी होते. कुणालाही गंभीर दुखापत झालेली नसून सर्व कर्मचारी सुखरूप आहेत.असे अधिकृत सूत्रांनी प्रतिनिधीस भ्रमणध्वनीद्वारे कळविले आहे.