Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमकारचोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांकडून उलगडा ; चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त

कारचोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांकडून उलगडा ; चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवाशाच्या घरासमोरून चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर कार एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत शोधून काढत आरोपीला जेरबंद केले. चारचाकी वाहन चोरी प्रकरणातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून पोलिस दलात समाधान व्यक्त केले जात आहे.फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजता घरासमोर पार्क केली होती. परंतु, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी वाहन गायब झाल्याचे लक्षात आल्यानं परिसरात शोध घेतला असता कारचा कुठेही मागमूस लागला नाही. दरम्यान, अज्ञात इसमाने वाहनाची चोरी केल्याची खात्री पटल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८५७/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुप्त व खात्रीलायक माहिती मिळवून तसेच सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील नवानाथ नगर भागात सापळा रचून दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव विनय मनोहर जाधव (रा. नवानाथ नगर, जळगाव) असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले वाहन छत्रपती संभाजीनगर येथे नेल्याचेही त्याने उघड केले.पोलिसांनी सुमारे ₹४,५०,००० किंमतीचे स्विफ्ट डिझायर वाहन हस्तगत करून जप्त केले आहे.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील पोउनि. राहुल तायडे, पोउनि. चंद्रकांत धनके, सफो. विजयसिंग पाटील, पोह. प्रदीप चौधरी, पोह. रमेश चौधरी, पोह. प्रमोद लाडवंजारी, पोह. किरण चौधरी, पोह. गिरीश पाटील, पोको. विशाल कोळी, पोको. नितीन ठाकूर, पोकों. किरण पाटील, पोको. शशिकांत मराठे, पोको. नरेंद्र मोरे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.संपूर्ण कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक यवन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या