Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगांव येथे आयोजित " रानभाजी महोत्सवात " सातपुड्यातील रान भाज्यांचे प्रदर्शन..

जळगांव येथे आयोजित ” रानभाजी महोत्सवात ” सातपुड्यातील रान भाज्यांचे प्रदर्शन..

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- जळगांव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषि विभाग, जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, व रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “रानभाजी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास भेट दिली. शेतकऱ्यांकडून विविध रानभाज्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जळगाव जिल्हयात मागील ५ वर्षांपासून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी सुध्दा जळगाव जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेतील आणि जिल्हयातील इतर जंगल परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांचे महत्व, त्यातील जीवनसत्वे, खनिजे आणि औषधी या गुणधर्माबाबत शहरवासीयांना महत्व पटवून देण्यासाठी कृषि विभाग, जळगाव, आत्मा जळगाव, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने “रानभाजी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच या महोत्सवात रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन सुध्दा करण्यात आले. यावेळी महराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रवासी वाहन कर्ज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाहनाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, वश्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल तसेच आदिवासी विभाग अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या