जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा 15 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता, कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, ख्वॉजामिया रोड, प्रगती शाळेजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.या रोजगार मेळाव्यात 374 हून अधिक रिक्त पदांसाठी विविध नामांकित कंपन्यांकडून थेट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या मेळाव्यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
10वी, 12वी, ITI (सर्व ट्रेड), पदवीधर (B.A, B.Com, B.Sc), B.E, BCA, MBA आणि इतर शाखांचे पदवीधारक उमेदवार.
भरतीसाठी सहभागी होणाऱ्या प्रमुख कंपन्या:
जैन फार्म फ्रेश फुड्स लि., शिरसोली
जैन इरिगेशन सिस्टीम लि., बांभोरी
सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गाडेगाव
गुजरात अंबुजा सिमेंट, चाळीसगाव
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
जळगाव जनता सहकारी बँक
खान्देश मोटर्स
छबी इलेक्ट्रिक प्रा. लि.
टी. के. प्रोसेसिंग प्रा. लि.
आणि इतर उद्योग संस्था
नोंदणी प्रक्रियेबाबत:
रोजगार इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. जे उमेदवार पूर्वनोंदणी करू शकलेले नाहीत, त्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे घेऊन थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 0257-2959790 (कार्यालयीन वेळेत)
या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.