Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगांव जिल्हा व सत्र न्यायालय येथे पिटमन जयंती उत्साहात साजरी

जळगांव जिल्हा व सत्र न्यायालय येथे पिटमन जयंती उत्साहात साजरी

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-  जळगाव जिल्हा लघुलेखक संघटना तर्फे जिल्हा व सत्र न्यायालय जळगांव येथे ग्रंथालय कक्षात सकाळी ठीक १०.०० वा. सर आयाँक पिटमन यांची २११वी जयंती साजरी करण्यात आली.

जळगांव जिल्हा व सत्र न्यायालय येथील ग्रंथालय कक्षात सर आयाँक पिटमन यांची २११वी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम.शेख, सम्माननीय जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश एस.एन.राजुरकर, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक अजयजी तांबटकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगांव यांचे स्विय सहाय्यक  जे.एल.जोशी, संघटनेचे अन्य पदाधिकारी तसेच  जळगांव येथील लघुलेखक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान कार्यक्रमाचच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांच्या यांच्या हस्ते सर आयझक पीटमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.दरम्यान रा.द.जोशी लघुलेखक यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सर आयलॅक पौटमन यांची जयंती साजरी करण्यामागील संघटनेचा प्रमुख उद्देश याबाबत थोडक्यात माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश एस.एन.राजुरकर यांनी सर आयॉक पिटमन यांची जयंती सर्व समावेशक असावी अशी भावना त्यांच्या मार्गदर्शनातुन व्यक्त केला.शेवटी अध्यक्षीय भाषणांत कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु.एस.एम.शेख यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करीत जळगांव न्यायालयीन लघुलेखक यांच्या न्यायालयीन कामकाजा बाबत कौतुकही केले.दिपक बोदडे यांनी सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त केले. सदरील कार्यक्रम कार्यालयीन वेळेच्या आंत संपन्न झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या