Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी : श्रीराम रथ-उत्सवात महिलांचे सोन्याचे...

जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी : श्रीराम रथ-उत्सवात महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अटटल महिला गुन्हेगारांना अटक ; मुद्देमाल हस्तगत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील श्रीराम रथउत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या सोन्याच्या मंगळसूत्राच्या वाट्या व मणी चोरी करणाऱ्या अटटल महिला गुन्हेगारांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत गजाआड केले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹४०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या उत्कृष्ट कारवाईबद्दल पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनेचा तपशील :
दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेदरम्यान श्रीराम रथउत्सवाचा सोहळा दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराजवळ सुरू होता. रथ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुषांची गर्दी झाल्याचा फायदा घेत काही महिला चोरट्यांनी उपस्थित महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून चोरी केली. या घटनेबाबत पीडित महिलांनी तत्काळ जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच मा. पोलिस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलिस अधीक्षक मा. अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नितीन गणापूरे तसेच पोलिस निरीक्षक श्री. सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या दोन स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या.

कारवाईचे नेतृत्व व पथकाची रचना :
या कारवाईत सफो सुनिल पाटील, पोहेका नंदलाल दशरथ पाटील, पोहेको विरेंद्र भगवान शिंदे, पोहेको भगवान तुकाराम पाटील, पोहेको उमेश भांडारकर, पोहेको सतीश पाटील, पोकेको योगेश पाटील, पोकॉ भगवान रामराव मोरे, पोकॉ अमोल अशोक ठाकूर, पोको प्रणय सुरेश पवार, मपोकॉ हर्षदा सोनवणे, मपोकॉ जयश्री मराठे, मपोकॉ मोनाली राजपूत यांनी सहभागी होऊन उत्कृष्ट समन्वय साधला.

सदर पथकाने संशयित महिला गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशीतून खालीलप्रमाणे सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ₹१२,००० किमतीच्या मंगळसूत्रातील २ सोन्याच्या वाट्या – वजन १.८७० ग्रॅम,
२) ₹४,००० किमतीचे ४ सोन्याचे मणी – वजन ०.६८० ग्रॅम,
३) ₹९,००० किमतीची मंगळसूत्रातील १ सोन्याची वाटी – वजन १.४६० ग्रॅम,
४) ₹९,००० किमतीची मध्यम आकाराची सोन्याची वाटी – वजन १.४६० ग्रॅम,
५) ₹६,००० किमतीची लहान आकाराची सोन्याची वाटी – वजन ०.९५० ग्रॅम,
एकूण जप्त मुद्देमाल किंमत : ₹४०,०००/-.

या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र. नं. ३७७/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

श्रीराम रथउत्सवासारख्या गर्दीच्या धार्मिक सोहळ्यात गुन्हा करून पसार होणाऱ्या चोरट्यांना पकडून गुन्हे शोध पथकाने दाखवलेली तत्परता व दक्षता उल्लेखनीय ठरली आहे. या कारवाईबद्दल जळगाव पोलिस दलाचे आणि गुन्हे शोध पथकाच्या टीमचे शहरात सर्वत्र कौतुक व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या