जळगाव /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- सध्या सर्वत्र विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस येत आहेत.एसटी महामंडळ जळगाव विभागातील लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याबाबत आणि 156 सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्यायबाबतच्या तक्रारीबाबत मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांचा पदभार धुळे येथील विभाग नियंत्रक विजय गीते यांना देण्यात आला आहे.
लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याप्रकरणी विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी तथा काम गार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे 25 फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सुरक्षा तसेच दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल मुंबई येथे पाठविला होता.
सुरक्षा खात्याने पाठवलेल्या अहवालात पीडित कर्मचारी, आस्थापना शाखेचे लिपिक व अधिकाऱ्यांचे जबाब सामील करण्यात आले होते. चौकशी सुरू असताना पीडित महिला वाहकावर दबाव तंत्राचा वापर केल्याप्रकरणी तक्रार झालेली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सुरक्षा व दक्षता खात्याच्या आदेशाने विभागीय कार्यालयातील लिपिक प्रीतम पाटील यांची यापूर्वीच जामनेर येथे बदली करण्यात आली.या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.