जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक येथे पार पडलेल्या विभागीय जलतरण स्पर्धा २०२५ मध्ये जळगाव येथील ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्धिनी कु. अक्षरा योगेश वराडे हिने उत्तुंग कामगिरी करत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत स्थान मिळविले आहे.अक्षराने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशामुळे तिची महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओरियन इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक तसेच कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून अक्षराचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. ती नशिराबाद पोलीस स्टेशनचे हवालदार योगेश वराडे यांची कन्या आहे.

