एका दिवसात १७७ प्रवाशांचे जळगावात आगमन, १८८ प्रवाशांचे जळगावातून प्रस्थान; फ्लाय ९१ व अलायन्स एअरची सेवा
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव विमानतळावर हवाई वाहतुकीला हळूहळू गती मिळताना दिसत असून प्रवाशांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव विमानतळावर एकूण ८ उड्डाणे झाली असून यामधून प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या दिवशी १७७ प्रवाशांचे आगमन तर १८८ प्रवाशांचे प्रस्थान झाले. फ्लाय ९१ आणि अलायन्स एअर या विमान कंपन्यांच्या माध्यमातून ही उड्डाणे पार पडली. वाढत्या उड्डाणांमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होत असून जळगावहून विविध शहरांमध्ये प्रवास करणे अधिक सुलभ होत आहे.गेल्या काही महिन्यांत जळगाव विमानतळाच्या सेवेत सातत्याने सुधारणा होत असून प्रवासी सुविधांमध्येही वाढ करण्यात येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यावसायिक आणि उद्योजक वर्गाकडूनही विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, उड्डाणांची वाढती संख्या आणि प्रवाशांची वाढती वर्दळ पाहता जळगाव विमानतळ हळूहळू विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. भविष्यात आणखी उड्डाणे सुरू झाल्यास या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

