Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगाव विमानतळावर यशस्वी Mock Drill ; समन्वय आणि सज्जतेचे उत्तम उदाहरण

जळगाव विमानतळावर यशस्वी Mock Drill ; समन्वय आणि सज्जतेचे उत्तम उदाहरण

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- आज रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) व एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण स्वरूपाची Mock Drill राबविण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ही ड्रिल पार पडली.

या ड्रिलमध्ये ICAO (International Civil Aviation Organization), DGCA (Directorate General of Civil Aviation), NDMA (National Disaster Management Authority) आणि Disaster Management Act, 2005 मधील सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी तथा DDMA अध्यक्ष आयुष प्रसाद, विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावल तसेच CISF, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, रुग्णवाहिका सेवा आदी यंत्रणांचा समावेश होता.

ड्रिलमध्ये स्पष्टीकरण विस्फोटाचा धोका (explosive threat), दृष्यता कमी होणे, नेव्हिगेशन एरर अशा विविध परिस्थितींचे अनुकरण करून बचाव कार्याची तयारी तपासण्यात आली. या वेळी Triage, Evacuee Zone, Control Room आणि Mobile Command Post यांचे संचालन प्रभावीपणे करण्यात आले. जिल्हाधिकारी अवघ्या १६ मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन ICAO/DGCA मानकांनुसार त्वरित निर्णय प्रक्रिया राबविण्यात आली.

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार – NDMA Mock Drill Guidelines, National Building Code 2016, आणि Factories Act 1948 (Section 41-B) नुसार अशा प्रकारच्या ड्रिल्सचे आयोजन, SOP दस्ताऐवजीकरण, GAP Analysis व पुनरावलोकन करणे अनिवार्य आहे.

ड्रिलनंतर झालेल्या आढावा बैठकीत काही त्रुटींची नोंद घेण्यात आली. यामध्ये कम्युनिकेशनमध्ये थोडा विलंब, वैद्यकीय प्रतिसादात अडथळा आणि काही ठिकाणी प्रवेश सुलभतेचा अभाव या बाबींवर चर्चा झाली. यावर उपाययोजना म्हणून पुढील ड्रिलमध्ये anti-satellite phone backup व dedicated radio wave system वापरण्याचे सुचवण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती काळातील प्रतिसाद क्षमतेत मोठी वाढ होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सजग व तत्पर आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या