जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने नियुक्त झालेल्या करिश्मा नायर यांनी शुक्रवारी (दि. १० एप्रिल) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रशासकीय इमारतीतून आपल्या कामकाजाची सुरुवात केली.
कामकाजाचा तात्काळ आढावा
पदभार स्वीकारल्यानंतर नायर यांनी जिल्हा परिषदेच्या जुन्या व नवीन अशा दोन्ही इमारतींतील विभागांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी कामकाजाची सविस्तर माहिती घेतली तसेच आवश्यक ते निर्देश दिले.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तत्पर व सकारात्मक कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला नवचैतन्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

