Saturday, March 28, 2026
police dakshta logo
Homeजळगावसावधान..! जळगावात कार चोरणारी टोळी सक्रिय; शिक्षकाची महागडी कार लांबवीली....

सावधान..! जळगावात कार चोरणारी टोळी सक्रिय; शिक्षकाची महागडी कार लांबवीली….

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील कोल्हे हिल्स परिसरात राहत असलेल्या शिक्षकाची महागडी कार लांबवण्यात आली आहे. शहरात दुचाकी पाठोपाठ आता चार चाकी वाहनांच्या चोरी मुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

शहरात कार चोरी करणारी टोळी सक्रिय

शहरात दुचाकीच्या चोरी नंतर आता चोरटे दुचाकींपाठोपाठ चारचाकी लांबावित आहे. आता चारचाकी वाहन चोरीला जावू लागल्याने वाहनधारक धास्तावले असून, कार मालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शहरात कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे यातून निष्पन्न होत आहे. चोरी गेलेल्या कारचे मालक मनोज सुरेश भादुपोता (42) हे शिक्षक असून ते आपल्या परीवारासह माऊली नगरात, कोल्हे हिल्स परिसर येथे वास्तव्याला आहे. ते शिक्षक असून त्याद्वारे आपला उदरनिर्वाह चालवितात. दि.15 सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री 11 वाजता त्यांनी त्यांची कार (क्रमांक एम.एच.19 ए.ई.1727) त्यांनी त्यांच्या घरासमोर पार्क केली. दि.16 सप्टेंबर शनिवार रोजी पहाटे सहा वाजता चोरट्यांनी ही कार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला. कार चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कार मालक मनोज भादूपोता यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू कार कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत दुपारी चार वाजता कार चोरीला गेल्याची तक्रार दिली. पुढील तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या