जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आदिवासी कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी लढा सुरू आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे.असे असतांना सरकारकडून या संदर्भात काहीही ठोस निर्णय होत नाही ,यामुळे कोळी समाज आता उग्र रूप धारण करतानाचे चित्र दिसत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी भुसावळच्या तापी पुलावर कोळी समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
समाज आता संतापला आहे. या अनुषंगाने आज शहराजवळच्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.यामुळे दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली.राष्ट्रीय महामार्ग ट्रॅफिकने जाम झाला.पोलिसांनी आंदोलकांना अटक करून रस्ता मोकळा केला.दरम्यान जवळपास एक ते सव्वा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.