Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या शिवाजीनगरात जुनी इमारत कोसळली, ३ सुखरूप बाहेर, एक महिला अडकली; युद्ध...

जळगावच्या शिवाजीनगरात जुनी इमारत कोसळली, ३ सुखरूप बाहेर, एक महिला अडकली; युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु

जळगाव/ तुषार वाघुळदे कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील शिवाजीनगरात आज सकाळी नऊ वाजता जुनी इमारत कोसळली.यात चार जण अडकले होते. तीन जण बाहेर निघाले आहेत.त्यापैकी एका महिलेचे शोध कार्य सुरू आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना मानली जात आहे.

घटनास्थळी सकाळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली आहे.बचाव कार्य युध्दपातळीवर सुरू असून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ,पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत राजश्री पाठक (५२) या गृहिणी अडकल्या आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या पथकाने बचाव मोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.या जुन्या इमारतीत अडकलेल्या एका पुरुषाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. महापालिका प्रशासनाने इमारत मालकांना यापूर्वीच नोटिसा बजावून त्या खाली करण्याचे बजावलेले होते.मात्र काही इमारत धारकांनी अद्यापपावेतो इमारती खाली केलेल्या नाहीत.अशाच जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती भवानीपेठ,जोशीपेठ परिसरातही आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक घटनासाठी दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या