Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या गेंदालाल मिल परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिताला अटक

जळगावच्या गेंदालाल मिल परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे.जळगाव शहरातील एका परिसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिताला शहर पोलीसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून लोखंडी तलवार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरात संशयित आरोपी दिपक प्रकाश भोसले (वय-२७) हा बेकायदेशीरित्या हातात लोखंडी तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी दिपक भोसले याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या