Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeक्राईमब्रेकिंग न्यूज: जळगावात तरुणावर कोयता, चाकू, रॉडने हल्ला ; तरुण गंभीर जखमी...

ब्रेकिंग न्यूज: जळगावात तरुणावर कोयता, चाकू, रॉडने हल्ला ; तरुण गंभीर जखमी : रुग्णालयात उपचारार्थ दाखल

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तीन ते चार जणांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. गंभीर जखमी तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल पाटील (वय १८) असून, तो एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे राहतो. माहिती अशी की, रविवारी दि. १४ सप्टेंबर सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास हर्षल पाटील आपल्या मित्रांसोबत रामेश्वर कॉलनी येथील राज शाळेजवळ बसलेला असताना अचानक जुन्या वादातून काही संशयित व्यक्तींनी त्याच्यावर लोखंडी कोयता, चाकू व रॉडने जोरदार वार केले. या हल्ल्यात हर्षल पाटील गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणाला स्थानिक नागरिकांनी खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने समजते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असले तरी अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही.

या घटनेचा पोलीस कसून तपास करीत असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील कारवाईसंबंधी माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या