Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावातील सबजेल मध्ये पुन्हा कैद्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; कैद्यांमध्ये खळबळ...!!

जळगावातील सबजेल मध्ये पुन्हा कैद्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; कैद्यांमध्ये खळबळ…!!

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगावातील सबजेल मध्ये पुन्हा कैदीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दीड वर्षात अशीच घटना घडली होती, तसेच इतर घटनेने कारागृह चर्चेत आले होते.खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून जिल्हा कारागृहात असलेला बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने बॅरेकमध्ये रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. वेळीच इतर कैद्यांनी त्याचे पाय धरुन ठेवत त्याला खाली उतरविले. या कैदीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी काही प्रमाणात गर्दी झाली होती.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे हा २६ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हा कारागृहातील कोव्हीड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. २८ ऑगस्ट २०२३रोजी कारागृहातील शिपाई विकास महाजन आणि त्यांचे सहकारी सुरेश बडगुजर, संदीप थोरात, नितीन सपकाळे यांची रात्रपाळी ड्युटी होती. सायंकाळी ६ वाजता ते ड्युटीसाठी कारागृहात हजर झाले. २९ रोजी रात्री १२.१० वाजेच्या सुमारास सुरेश बडगुजर, नितीन सपकाळे यांच्याकडून ड्युटी चार्ज देवाण-घेवाण करीत असताना अचानक कोव्हीड बॅरेकमधील कैद्यांची आरडाओरड चालू झाली. धावपळही सुरू झाली. त्यामुळे या सर्व जणांनी कोव्हीड बॅरेककडे धाव घेतली.यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल सोनवणे याने पांढऱ्या रंगाच्या बागायतदार रुमालाने बॅरेकमधील कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला. कारागृहातील पोलिसांनी त्या बॅरेकमधील बंदींना गळफास घेतलेल्याचा पाय पकडून ठेवण्यास सांगितले. एकाने त्याच्या गळ्यातील रुमाल सोडवून त्याला खाली उतरवित त्याचा जीव वाचविला आहे.या घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक ए.आर. वांढेकर, तुरुंग अधिकारी गजानन पाटील हे कारागृहातील बॅरेककडे लागलीच पोहचले. त्यांनी बॅरेकमध्ये जावून बंदी अमोल सोनवणे याच्याशी चर्चा केली. त्याची प्रकृती सुस्थितीत होती.त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शिपाई विकास महाजन यांच्या फिर्यादीवरून बंदी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.दरम्यान जळगावच्या कारागृहाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या